esakal | मराठा आरक्षण; शिवसंग्रामने केले धरणे आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

shivsangram

मराठा आरक्षण; शिवसंग्रामने केले धरणे आंदोलन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या, तसेच १९ ऑगस्ट २०२१ रोजी मुंबईत झालेल्या राज्यव्यापी बैठकीत घेण्यात आलेल्या ठरावांची अंमलबजावणी करण्यात यावी प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी शिवसंग्राम मराठा क्रांती संघर्ष मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य झाल्या नाही तर यापुढे तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

हेही वाचा: पुर्णा नदीवरील पुल गेला वाहुन;पाहा व्हिडिओ

शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष किशोर चव्हाण यांच्या नेतृत्वात गुरूवारी (ता.दोन) जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे तसेच सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर केंद्र सरकारने संसदेच्या अधिवेशनात १०२ वी दुरुस्ती करून १२७ वी घटनादुरुस्ती केली आणि राज्यांना आरक्षण देण्याचे व मागास ठरवण्याचे अधिकार दिले आहेत. यासारखे निर्णय होत असताना राज्य सरकार मात्र कोणतीही पावले उचलत नाही. मराठा आरक्षण रद्द झाल्याच्या निर्णयाचा तमाम मराठा समाजावर परिणाम होत असतानाही राज्य सरकार मात्र कोणतीही ठाम भूमिका घेत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा: पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान ;पाहा व्हिडिओ

१९ ऑगस्ट २०२१ रोजी मुंबई येथे शिवसंग्राम मराठा क्रांती संघर्ष मोर्चा आणि इतर मराठा संघटना व प्रमुख समन्वयकांच्या उपस्थितीत झालेल्या राज्यव्यापी बैठकीतील ठरावांची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसह विविध २० मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. आंदोलनात जिल्हाध्यक्ष किशोर चव्हाण, सचिन मिसाळ, बाळासाहेब भगनुरे, अमोल काळे, प्रा. सुभाष जाधव, अर्जुन चौधरी, पंकज उदरभरे,लक्ष्मण नवले, प्रा. एम. यु. नवले आदी सहभागी झाले होते.

loading image
go to top