
परळी वैजनाथ : गेल्या पाच दिवसांपासून मुंबई येथील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण द्या यासाठी आंदोलन सुरू होते. शासनाने मंगळवारी (ता.०२) हैद्राबाद गॅझेट लागू केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनाला मिळालेल्या यशाबद्दल येथील राणी लक्ष्मीबाई टाॅवर चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुलाल उधळून, फटाके फोडून,पेढे वाटप करत मराठा समाजातील युवकांनी आनंदोत्सव साजरा केला.