Tuljapur Celebrates : मराठा आरक्षणाच्या यशानंतर तुळजापुरात तुळजाभवानी मातेची आरती करत, रॅली, पेढे, गुलाल आणि फटाक्यांच्या जल्लोषात मराठा समाजाने विजय साजरा केला.
तुळजापूर : मराठा समाजास आरक्षण मिळाल्यानंतर तुळजाभवानी मातेची आरती समाज बांधवांनी मंगळवारी ता.2 सायंकाळी केली. शहरात मराठा समाजास आरक्षण मिळाल्यानंतर छत्रपती शिवाजीमहाराज पुतळ्यापासून मोठी रॅली मराठा समाज बांधवांनी काढली.