मराठवाड्यात नवे सहा हजार ७३८ कोरोना रुग्ण, १६८ जणांचा मृत्यू

औरंगाबाद जिल्ह्यात ९४६ रुग्णांची भर पडली. त्यात शहरातील ३२८, ग्रामीण भागातील ६१८ जणांचा समावेश आहे.
मराठवाड्यात नवे सहा हजार ७३८ कोरोना रुग्ण, १६८ जणांचा मृत्यू

औरंगाबाद : मराठवाड्यात (Marathwada) गुरुवारी (ता.सहा) दिवसभरात सहा हजार ७३८ कोरोनाबाधित (Corona Positive Patients) आढळले. जिल्हानिहाय वाढलेली रुग्णसंख्या अशी; बीड (Beed) १४३७, लातूर (Latur) ११९५, औरंगाबाद (Aurangabad) ९४६, जालना (Jalna) ९०८, उस्मानाबाद (Osmanabad) ८१३, नांदेड (Nanded) ६६१, परभणी (Parbhani) ६५०, हिंगोली (Hingoli)१२८. उपचारादरम्यान १६८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात लातूरमध्ये ३६, बीड २९, औरंगाबाद २५, परभणी- उस्मानाबादेत प्रत्येकी २४, नांदेड १७, हिंगोली ७, जालन्यातील सहा जणांचा समावेश आहे. (Marathwada Corona Updates Above 6 Thousand Covid Cases Reported)

मराठवाड्यात नवे सहा हजार ७३८ कोरोना रुग्ण, १६८ जणांचा मृत्यू
Video - शववाहिका चालकांची जिवावर बाजी; कोरोना मृतदेह स्मशानभूमीत नेण्याची शर्थ

औरंगाबाद जिल्ह्यात २५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. आतापर्यंत एकूण २ हजार ६८३ जणांचा मृत्यू झाला आहे. घाटी रुग्णालयात पैठण येथील पुरुष (वय ४६), खुलताबाद येथील पुरुष (४८), पैठण येथील पुरुष (७३), श्रीरामपूर येथील महिला (४५), कन्नड येथील महिला (२६), गजगाव (ता. गंगापूर) येथील पुरुष (५५), शेळगाव (जि. औरंगाबाद) येथील पुरुष (७५), मिसारवाडी येथील पुरुष (४९), बोरखेडा (जि. औरंगाबाद) येथील पुरुष (६३), गंगापूर येथील महिला (७३), सिल्लोड येथील पुरुष (६५), पैठण येथील महिला (५५), गंगापूर येथील महिला (५८), वैजापूर येथील पुरुष (६५), सिडको (औरंगाबाद) येथील महिला (६६), बजाजनगर (औरंगाबाद) येथील पुरुषाचा (६२) मृत्यू झाला. फुलंब्री येथील महिला (६५), हनुमंतखेडा (ता. सोयगाव) येथील पुरुषाचा जिल्हा रुग्णालयात तर नऊ जणांचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.

मराठवाड्यात नवे सहा हजार ७३८ कोरोना रुग्ण, १६८ जणांचा मृत्यू
Video: औरंगाबादेत कोरोना लसीकरणासाठी गर्दी, नागरिकांना केंद्र बंद करण्याची धमकी

औरंगाबादेत सध्या नऊ हजार जणांवर उपचार

औरंगाबाद जिल्ह्यात ९४६ रुग्णांची भर पडली. त्यात शहरातील ३२८, ग्रामीण भागातील ६१८ जणांचा समावेश आहे. रुग्णसंख्या १ लाख २९ हजार ८४८ झाली. बरे झालेल्या आणखी १ हजार ५१ रुग्णांना सुटी देण्यात आली. यात शहरातील ५०२, ग्रामीण भागातील ५४९ जणांचा समावेश आहे. आजपर्यंत १ लाख १७ हजार ८५१ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ९ हजार ३१४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com