esakal | मराठवाड्यात कोरोनाचे नवे सहा हजार ८९२ रुग्ण, ९१ जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

मराठवाड्यात कोरोनाचे नवे सहा हजार ८९२ रुग्ण, ९१ जणांचा मृत्यू

मराठवाड्यात कोरोनाचे नवे सहा हजार ८९२ रुग्ण, ९१ जणांचा मृत्यू

sakal_logo
By
- प्रकाश बनकर

औरंगाबाद : मराठवाड्यात आणखी ९१ जणांच्या मृत्यूची नोंद गुरुवारी (ता. १५) झाली. त्यात औरंगाबादेतील २३, नांदेड १९, लातूर १८, परभणी १२, जालना १०, बीड पाच तर हिंगोलीतील चौघांचा समावेश आहे. दिवसभरात ६ हजार ८९२ कोरोनाबाधितांची भर पडली. जिल्हानिहाय वाढलेली रुग्णसंख्या अशी ; लातूर १६६३, औरंगाबाद १३२९, नांदेड १२८८, बीड ९६३, जालना ७०२, परभणी ६७६, हिंगोली २७१.

घाटी रुग्णालयात १८ तर खासगी रुग्णालयांत पाच जणांचा मृत्यू झाला. मीरानगर, पडेगाव येथील ६३ वर्षीय पुरुष, किनगावातील ६५ वर्षीय पुरुष, गुलमोहर कॉलनीतील ७७ वर्षीय महिला, वैजापुरातील ५३ व ७२ वर्षीय पुरुष, मानेगाव वैजापूर येथील ४० वर्षीय पुरुष, सिडको एन-आठमधील ६८ वर्षीय महिला, नवजीवन कॉलनी, हडको येथील ६३ वर्षीय महिला, नंदनवन कॉलनीतील ६२ वर्षीय पुरुष, प्रतापनगरातील ३९ वर्षीय पुरुष, राजनगरातील ७९ वर्षीय पुरुष, मिटमिटा-पडेगाव येथील ५९ वर्षीय पुरुष, रामपूरवाडी, कन्नड येथील ५४ वर्षीय पुरुष, सिडको एन-पाच येथील ६२ वर्षीय पुरुष, मिसारवाडीतील ५० वर्षीय पुरुष, इंदिरानगर गारखेडा येथील ७५ वर्षीय महिला, गारखेड्यातील ३९ वर्षीय महिला, संतोषमातानगर- मुकुंदवाडीतील ३९ वर्षीय पुरुषाचा घाटीत उपचारादरम्यान मृत्यू झाला. अघुर वैजापूर येथील ६८ वर्षीय पुरुष, श्रेयनगरातील ८५ वर्षीय पुरुष, उल्कानगरीतील ४८ वर्षीय पुरुष, रामानंद कॉलनीतील ८५ वर्षीय महिला, ऊर्जानगर सातारा येथील ७६ वर्षीय पुरुषाचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.

औरंगाबादेत तेराशे नवे रुग्ण, आणखी तेराशे बरे

औरंगाबाद जिल्ह्यात दिवसभरात १ हजार ३२९ नव्या रुग्णांची भर पडली. रुग्णसंख्या १ लाख ४ हजार ५८३ वर पोचली आहे. बरे झालेल्या १ हजार ३१२ जणांना सुटी देण्यात आली. आतापर्यंत ८६ हजार ७१२ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १५ हजार ७९६ रुग्णांवर उपचार सुरू आहे. दरम्यान, आणखी २३ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत २ हजार ७५ जणांचा मृत्यू झाला आहे.