

Chhatrapati Sambhajinagar News
esakal
छत्रपती संभाजीनगर:अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे मराठवाड्याचा हापूस म्हणून ओळखल्या जाणारा केशर आंबा उत्पादक संकटात सापडले. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. फळगळ झाली असून यंदा उत्पादनात सरासरी तब्बल ६० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता ज्येष्ठ फळबाग शास्रज्ञ भगवान कापसे यांनी व्यक्त केली.