esakal | मराठवाड्यात सोमवारपर्यंत पुन्हा पावसाचा अंदाज
sakal

बोलून बातमी शोधा

Marathwada Rain : पाऊस सरासरीच्या कितीतरी पुढे!

Marathwada Rain : पाऊस सरासरीच्या कितीतरी पुढे!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : अतिवृष्टी आणि ढगफुटीसदृश परिस्थितीमुळे सर्वत्र हाहाकार उडविल्यानंतर गेले दोन दिवस पावसाने थोडी उसंत दिली आहे. शुक्रवारी (ता. एक ) मराठवाड्याच्या काही भागांत पाऊस झाला. शनिवार (ता. दोन ) पासून पुन्हा पुढील तीन दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दरम्यान यंदा पावसाने सरासरी केव्हाच ओलांडली आहे. जूनपासून आतापर्यंत ६७९.५ मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित होते मात्र सप्टेंबर अखेरपर्यंत त्याही पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. सप्टेंबरअखेरपर्यंत प्रत्यक्षात १०२०.५ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे.

मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यात मॉन्सूनमध्ये सरासरी ६७९.५ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असते. मात्र यंदा पावसाने सरासरी केव्हाच ओलांडली आहे. जूनपासून सप्टेंबर अखेरपर्यंत मराठवाड्यात १०२०.५ मिलिमीटर १५०.१८ टक्के पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस नांदेड त्याखालोखाल परभणी व हिंगोली जिल्ह्यात पाऊस सरासरी ओलांडून पावसाची थोडी उसंतझाला. औरंगाबाद जिल्ह्यात सप्टेंबर अखेरपर्यंत सरासरी ५८१.७ मिलिमीटर अपेक्षित होता त्या तुलनेत ९३२.५ मिलिमीटर, जालना जिल्ह्यात ५८१.७ मिलिमीटर अपेक्षित ६०३ होता त्या तुलनेत १०६ . ६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. बीड जिल्ह्यात ५६६.१ मिलिमीटर अपेक्षित होता. त्या तुलनेत ९९१.४ मिलिमीटर पाऊस झाला. लातूर जिल्ह्यात ७०६ मिलिमीटर अपेक्षित होता त्या तुलनेत ९०९.९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. उस्मानाबादेत ६०३.१ मिलिमीटर अपेक्षित होता त्या तुलनेत ८३०.५ मिलिमीटर पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यात ८१४.४ मिलिमीटर अपेक्षित होता त्या तुलनेत ११६८.८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. परभणी जिल्ह्यात ७६१.३ मिलिमीटर अपेक्षित होता, त्या तुलनेत ११०२.१ मिलिमीटर पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यात ७९५.३ मिलिमीटर अपेक्षित होता त्या तुलनेत १०८०.७ मिलिमीटर पाऊस झाला.

असा आहे पावसाचा अंदाज

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार शनिवारी ( ता. दोन ) परभणी, बीड, लातूर व नांदेड जिल्हयात तर रविवारी ( ता. तीन) औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली व बीड जिल्ह्यात आणि सोमवारी (ता. चार ) औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, परभणी व उस्मानाबाद जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याचे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठच्या ग्रामीण कृषी मौसम सेवाचे मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ. के. के. डाखोरे यांनी सांगितले.

loading image
go to top