

छत्रपती संभाजीनगर : तब्बल महिनाभर पावसाच्या खंडानंतर मराठवाड्यात पावसाने दमदार हजेरी लावली. गेल्या तीन दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वदूर संततधार पाऊस सुरू आहे. चोवीस तासांत मराठवाड्यात सरासरी २५.५ मिमी. पावसाची नोंद झाली असून शेती पिकांना जीवदान मिळाले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.