
छत्रपती संभाजीनगर : बऱ्याच दिवसांच्या खंडानंतर मराठवाड्याच्या विविध भागांत सोमवारी (ता. २१) रात्री व मंगळवारी (ता. २२) पाऊस झाला. त्यामुळे खरिपातील पिकांना जीवदान मिळाले. बीड, जालना, परभणी जिल्ह्यांत बऱ्यापैकी पावसाची नोंद झाली आहे. काही मसहूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. सर्वदूर समाधानकारक पावसाची व त्याच्या सातत्याची गरज आहेच.