छत्रपती संभाजीनगर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या २३३ महाविद्यालयांची २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश क्षमता स्थगित (शून्य) करण्यात आली आहे.
त्यामुळे संलग्नीकरण यादीतील ४८४ महाविद्यालयांपैकी २३३ महाविद्यालयांत नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार नाही. आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करत विद्यापीठाने बड्या महाविद्यालयांनाही दणका दिला.