
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठास ‘नॅक’चे ए प्लस मानांकन प्राप्त झाल्याबद्दल कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्यासह सहकाऱ्यांच्या अभिनंदनाचा ठराव अधिसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. याशिवाय १८ प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. यात पुढील शैक्षणिक वर्षापासून तीन नव्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.