
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील उपकुलसचिव हेमलता ठाकरे यांनी झोपेच्या गोळ्या सेवन करून बुधवारी (ता. नऊ) आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात आयसीयूत उपचार सुरू असून, त्यांनी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी विविध कारणांनी नोटीस काढून छळल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, विद्यापीठ प्रशासनाने त्यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत.