मराठवाड्यात पीके करपू लागली

मराठवाड्यात पीके करपू लागली
Published on
पाऊस पळाला, धरणे अद्याप तळाला -- मराठवाड्यात मोठी तूट, खरीप धोक्यात, पिण्याच्या पाण्याचीही चिंता -- छत्रपती संभाजीनगर, ता. ७ ः मराठवाड्यात पावसाअभावी जलसाठ्यांची स्थिती चिंताजनक बनली आहे. यात सर्वांत जास्त फटका लातूर जिल्ह्याला बसला आहे. त्यामुळे लातूरमधील मांजरा आणि माकणी धरणाचा जलसाठा फक्त पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी घेतला. तसेच या प्रकल्पांवर गस्त वाढविली असून, दोन धरणांवरील वीजपंप जप्त करण्याचे आदेश सोमवारी (ता. सात) काढले. दरम्यान, कालवा समिती बैठक होईपर्यंत शेतकऱ्यांनी आगामी रब्बीचेही नियोजन करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. मराठवाडा विभागात मागील दीड महिन्यापासून समाधानकारक पाऊस पडलेला नाही. २६ दिवसांहून अधिक पावसाचा सलग खंड आहे. त्यामुळे मराठवाड्यातील पिके करपू लागली असून, संपूर्ण खरीप पीक वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. पावसाळ्यात पडणाऱ्या ७५० मिलिमीटर पावसाच्या तुलनेत केवळ ३८६ मिलिमीटर म्हणजेच केवळ ५१ टक्के पाऊस पडला आहे. अजूनही ४९ टक्के टक्के पावसाची तूट कायम आहे. जायकवाडी धरण वगळता इतर कोणत्याही प्रकल्पात १०० टक्के उपयुक्त पाणीसाठा झालेला नाही. त्यामुळे धरणांतील पाणी पिण्यासाठी राखीव करण्याचा निर्णय झाल्याची माहिती विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. ‘मांजरा’, ‘माकणी’तील पाणी पिण्यासाठी राखीव -- जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत सरासरीच्या ८० टक्के पाऊस झाला असला, तरी लातूरमध्ये सरासरीच्या केवळ ५४.६४ टक्के, तर परभणीत ५७.२९ टक्के पाऊस झाला आहे. सद्यःस्थितीत विभागातील ४५० गावे तहानलेली असून टँकरसह खासगी विहिरी अधिग्रहित करून पिण्यासाठी पाणी पुरवावे लागत आहे. लातूर जिल्ह्यात सध्या ८८ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मांजरा, माकणी धरणांतील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पांवर गस्त वाढविण्यात आली असून, या प्रकल्पावर असलेले वीजपंप जप्त करण्याचा आदेश दिल्याचे जी. श्रीकांत यांनी सांगितले. ---------- मोठ्या धरणांतील पाणीसाठा प्रकल्प टक्केवारी जायकवाडी ८९.९७ निम्न दुधना २२.४९ येलदरी ६२.५२ सिद्धेश्वर ३५.०६ माजलगाव २५.९० मांजरा १२.२६ पैनगंगा ६८.९३ मानार ६१.४४ निम्न तेरणा २४.२७ विष्णुपुरी ९४.२३ सीना कोळेगाव ००.०० एकूण ६७.७३ ------- असा आहे पाऊस (मिलिमीटर) -- - १ जून ते ७ सप्टेंबरपर्यंतच्या पावसाची सरासरी : ५५२.२६ - प्रत्यक्ष पाऊस : ३८६.३६ - सरासरीच्या तुलनेत ः ७०.३२ टक्के - पावसाची तूट : २९.६८ टक्के वार्षिक सरासरी : ७५०.८१ मिमी वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत : ५१.६३ टक्के -----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com