

Water tankers supply drinking water to drought-affected villages in Maharashtra's Marathwada region.
esa
छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पाणीटंचाईच्या झळा वाढू लागल्याने टॅंकरची संख्या आता ८५० वर गेली आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही संख्या ५०६ वर होती. केवळ १२ दिवसांत म्हणजेच १६ नोव्हेंबरदरम्यान ती १४६ ने वाढली. याशिवाय तब्बल १ हजार ४९८ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्तालय प्रशासनातर्फे शुक्रवारी (ता.२७) देण्यात आली. हिवाळ्यातच ५५० गावे, ३४७ वाड्या तहानलेल्या आहेत.