esakal | २१ नखी जिवंत कासव अन् कुत्रा न दिल्याने लग्न मोडले!
sakal

बोलून बातमी शोधा

lagn

२१ नखी जिवंत कासव अन् कुत्रा न दिल्याने लग्न मोडले!

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद: साखरपुडा करुन हुंड्यापोटी सव्वादोन लाख रुपये आणि सोन्याची अंगठी घेऊन मुलीला नोकरी लावून देतो, म्हणत दहा लाख रुपये, कासव, कुत्रा, समईसह अधिकची रक्कम न दिल्यावरुन लग्नाला नकार दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार १० फेब्रुवारी ते १५ मार्च २०२० याकाळात रमानगरात घडला. त्यावरुन सहा जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

वीटभट्टी व्यावसायिक अनिल मगनराव सदाशिवे (५५, रा. गल्ली क्र. २, रमानगर) यांच्या मुलीचा विवाह नाशिक येथील तरुणाशी ठरला होता. साखरपुडा करण्यापूर्वी नाशिक येथील रविंद्र चराटे, लता चराटे, आकाश चराटे, पूनम चराटे, माधुरी चराटे (सर्व रा. डायमंड कॉलनी, नाशिक रोड) आणि संतोष उमले (रा. बाळापुर, जि. अकोला) यांनी हुंड्यापोटी दोन लाख अकरा हजार आणि सोन्याची अंगठी घेतली.

हेही वाचा: 'कोरोना योद्ध्यांच्या ५० लाखाच्या विम्याचा ५ ऑगस्टपर्यंत निर्णय घ्या'

त्यानंतर मुलीला नोकरीला लावून देतो असे म्हणत त्यांनी दहा लाखांच्या रकमेसह, एकवीस नखी जिवंत कासव, काळ्या रंगाचा विदेशी कुत्रा, समईसह आणखी पैशांची मागणी केली. मात्र, सदाशिवे याची पूर्तता करु शकले नाही. त्यामुळे चराटे कुटुंबाने लग्नाला नकार देत सदाशिवे कुटुंबियांचा विश्वासघात केला. तसेच आर्थिक फसवणुक केली. त्यावरुन उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास महिला उपनिरीक्षक आढाव या करत आहेत.

loading image