
फुलंब्री : तालुक्यातील धामणगाव येथील विवाहितेने सासरच्या लोकांकडून होणाऱ्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून विष घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी चारच्या दरम्यान घडली. या प्रकरणी रविवारी फुलंब्री पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून पतीला अटक केली आहे. आस्मा जमील मुन्शी शेख असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आहे.