मराठवाडा पदवीधर निवडणुकीतून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची माघार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

2graduate_20constituency

मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीतून मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने माघार घेतलीय. माकपकडून डॉ. भाऊसाहेब झिरपे यांनी निवडणूक लढविण्यासाठी तयारी सुरू केली होती.

मराठवाडा पदवीधर निवडणुकीतून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची माघार

sakal_logo
By
शेखलाल शेख

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीतून मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने माघार घेतलीय. माकपकडून डॉ. भाऊसाहेब झिरपे यांनी निवडणूक लढविण्यासाठी तयारी सुरू केली होती. मात्र वर्षभरात मार्क्सवादी पक्षांमध्ये कार्यरत असलेले प्रभावी नेते डॉ. विठ्ठल मोरे, उद्धव भवलकर, अरुण शेळके, प्रा. बाबासाहेब सरवदे यांचे निधन झाले. मराठवाड्यात डाव्या पक्षाचे मोठे नुकसान झाल्यामुळे ही निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार भाऊसाहेब झिरपे यांनी केली आहे.

बोराळकर हे विजयी व्हावेत हे गोपीनाथ मुंडे साहेबांचे स्वप्न आणि ते पूर्ण करू, पंकजा मुंडेंनी व्यक्त केला विश्‍वास


औरंगबाद विभाग पदवीधर मतदारसंघात लढण्यासाठी माकपतर्फे झिरपे यांनी मागील एक वर्षापासून तयारी केली होती. माकप औरंगाबाद जिल्हा कमिटीने फेब्रुवारी महिन्यात एकमताने त्यांच्या उमेदवाराचा ठराव राज्य समितीला पाठविला होता. त्यातच या निवडणूकीत माकपसाठी महत्त्वाची भूमिका असलेले डॉ. विठ्ठल मोरे, ऊद्धव भवलकर, अरूण शेळके, बाबासाहेब सरवदे यांचे निधन झाल्याने माकपचे मराठवाड्यात मोठे नुकसान झाले. तसेच अपुरा वेळ, निधी यामुळे ही निवडणुक न लढविण्याचा निर्णय घेण्यात असल्याची माहिती भाऊसाहेब झिरपे यांनी प्रसिद्धपत्रकाद्वारे दिली आहे.

संपादन - गणेश पिटेकर

loading image
go to top