स्थानिक उद्योगांना मोठ्या कंपन्यांशी जोडणार
-
मसिआच्या सभेत औद्योगिक प्रश्नांवर मंथन ः पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर भर
-
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील लघु व मध्यम उद्योगांचे प्रश्न सोडविण्यासह स्थानिक उद्योजकांना मोठ्या कंपन्यांच्या पुरवठा साखळीत संधी मिळवून देण्यासाठी मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चर (मसिआ) प्रयत्नशील आहे. आगामी काळात उद्योगांसाठी रस्ते, वीज, पाणीपुरवठा आणि ड्रेनेजच्या प्रश्नांवर पाठपुरावा करण्यासह उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील सहकार्य वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. मसिआच्या अर्धवार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष गजानन देशमुख यांनी ही माहिती दिली.
चिकलठाणा येथील रत्नप्रभा बाळासाहेब पवार सभागृहात बुधवारी (ता. २८) सभा झाली. मागील सहा महिन्यांतील कामांचा आढावा घेताना देशमुख यांनी गुंठेवारी नियमितीकरणासाठी ४८७ फाइल सीएसएमआरडीएकडे सादर केल्याचे सांगितले. वाळूज औद्योगिक क्षेत्रातील वीजपुरवठा सुधारण्यासाठी कव्हर्ड कंडक्टर प्रकल्पाचा पाठपुरावा सुरू आहे. टोयोटा किर्लोस्कर, जेएसडब्ल्यू आणि एथर यासारख्या कंपन्यांशी स्थानिक उद्योजकांना जोडण्यासाठी व्हेंडर डेव्हलपमेंट कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येत आहे. मसिआच्या तीन ठिकाणी झालेल्या रक्तदान शिबिरांतून १९७ युनिट रक्तसंकलन झाले. कॅन्टॉन फेअरच्या आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यात ५७ उद्योजक सहभागी झाले, तर महिला गृहउद्योग प्रदर्शनात ३४ स्टॉल उभारण्यात आले. मसिआला २०२३ ते २०२७ या कालावधीसाठी १२ ए आणि ८० जी प्रमाणपत्रे मंजूर झाली आहेत. आगामी काळात रेडी इंजिनिअर एमएसएमई इनोव्हेशन कार्यक्रम, जेन नेक्स्ट विंग, स्किल डेव्हलपमेंट सेंटर, एक्झिबिशन प्लेस डेव्हलपमेंट आणि जिल्हा उद्योग पुरस्कार योजना राबविण्यावर भर राहणार आहे. नव्या सभेत ७४ सदस्यांचे स्वागत करण्यात आले. १६० उद्योजकांची उपस्थिती होती. एलएपीएल ऑटोमोटिव्हचे नीरज गोयल, अभय हंचनाळ, एकदंत मोल्डर्सचे राजकुमार लड्डा, कृपा टेक्नॉलॉजीचे तुकाराम पोटले, स्वराज एंटरप्राइजचे प्रदीप राऊत आणि सी वेल्थ कॉर्पोरेशनचे राजेश जाधव यांचा विविध कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला. महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अध्यक्ष गिरीश थोरात व सहायक महाव्यवस्थापक षण्मुख वानखेडे यांनी बँकेच्या योजनांची माहिती दिली.
-
यांची होती उपस्थिती
-
माजी अध्यक्ष केशव पारटकर, अर्जुन गायके, भारत मोतींगे, किशोर राठी, अभय हंचनाळ, अनिल पाटील, चेतन राऊत, अर्जुन गायकवाड, राजेंद्र चौधरी, राहुल मोगले, वीरेन पाटील, राजेश मानधनी, सहसचिव मिलिंद कुलकर्णी, प्रल्हाद गायकवाड, नितीन तोष्णीवाल, आनंद पाटील, मंगेश निटुरकर, सचिन देशमुख, सर्जेराव साळुंके, राजेश विधाते, मनीष अग्रवाल, सचिन गायके, दिलीप चौधरी, दुष्यंत आठवले, अभिषेक मोदानी, श्रीकांत सूर्यवंशी, नीलेश देवकर, राहुल धामणे, रमाकांत पुलकुंडवार, विनोद गांधी, तुकाराम पोटले, सुरेश खिल्लारे, कमलाकर पाटील, रोहन येवले, संजय भाताडे, महिला विभागाच्या सहसंयोजिका सोनल भोसलेंसह आदी उपस्थित होते.