
छत्रपती संभाजीनगर : शेतकरी आणि सावकार म्हटलं की डोळ्यांसमोर येते ती हतबलता. गरजा भागविण्यासाठीची हातपाया पडून घेतलेला पैसा अन् कर्ज फेडण्यासाठी सुरू असलेली धडपड. वर्ष २०२४-२५ मध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत शेतकऱ्यांनी ४३९ परवानाधारक सावकारांकडून मार्च २०२५ अखेर तब्बल १९ कोटी १३ लाख ९७ हजार रुपये व्याजाने घेतल्याचे समोर आले आहे.