
बजाजनगर (छत्रपती संभाजीनगर) : वाळूज औद्योगिक परिसरातील साजापूर क्रांतिनगर भागात पाचशे रुपयांच्या बनावट नोटांच्या छापखान्यावर छापा टाकून पोलिसांनी तो उद्ध्वस्त केला. बनावट नोटांचे रॅकेट चालविणाऱ्या सात सराईत आरोपींना अटक केली. त्यांच्या ताब्यातून बनावट नोटांसह ८८ लाख २० हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अहिल्यानगर पोलिसांनी गुरुवारी (ता. ३१) रात्री उशिरा ही कारवाई केली.