Paithan MIDC Accident : पैठणमध्ये कंपनीला आग; होरपळून कामगाराचा मृत्यू
MIDC Accident : पैठण एमआयडीसीतील इनकोअर हेल्थ केअर फार्मा कंपनीत भीषण आग लागून एका कामगाराचा होरपळून मृत्यू झाला, तर दोन कामगार किरकोळ जखमी झाले. आग विझवण्यासाठी तब्बल तीन तास प्रयत्न करण्यात आले.
जायकवाडी : पैठण एमआयडीसीतील इनकोअर हेल्थ केअर फार्मा कंपनीत शनिवार (ता.२६) रोजी दुपारी लागलेल्या भीषण आगीत एका कामगाराचा होरपळून मृत्यू झाला, तर दोन कामगार जखमी झाले. रामदास जगन्नाथ बडसल (वय ५५, रा. सेंटपॉल, मुधलवाडी) यांचा असे मृताचे नाव आहे.