क्रीडा मैदान गाजवले; मत्स्योदरीच्या खेळाडूंची चमक
तीर्थपुरी, ता.४ : सावित्रीबाई फुले विद्यालय, बोंधलापुरी येथे झालेल्या तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत तीर्थपुरी येथील मत्स्योदरी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांत यश संपादन केले.
धावणे व रिले : १०० मीटरमध्ये मुक्ता माळोदे हिने प्रथम, देवयानी सावंत हिने द्वितीय क्रमांक मिळविला. २०० मीटरमध्ये राधिका मोहाळे प्रथम, अंजली आरबड द्वितीय आली. ४०० मीटरमध्ये दीप्ती काळे प्रथम, कल्याणी बेडके द्वितीय ठरली. ६०० मीटरमध्ये गायत्री भोसले हिने प्रथम क्रमांक मिळविला. ८०० मीटरमध्ये सारिका नाईकवाडे प्रथम, कीर्ती उढाण द्वितीय आली. १५०० मीटरमध्ये प्रथमेश गरड प्रथम, वैष्णवी गंगाधर वाघमारे द्वितीय आली. ३००० मीटरमध्ये साक्षष जुगधर प्रथम, वैष्णवी नाईक व महेश जुगधर यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. गोळाफेकमध्ये उत्कर्षा खोटे प्रथम, कोमल शिंदे द्वितीय, कल्याणी भालेराव व अभिनंदन गरड यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. थाळीफेकमध्ये पूजा आव्हाड, कोमल कृष्णा आव्हाड व ओम फुलांरे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. मोहिनी शिंदे व अभिमन्यू गरड यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. भालाफेकमध्ये अभिमन्यू गरड प्रथम, शिवराज चिमणे द्वितीय आला. हातोडाफेकमध्ये पार्थ डांगे प्रथम, ओम फुलांरे द्वितीय आला. तिहेरी उडीत कल्याणी बेडके हिने प्रथम, उंच उडीत अभिजित घुले याने द्वितीय, तर लांब उडीत सागर बर्डे प्रथम व श्रावणी कातकडे हिने द्वितीय क्रमांक मिळविला.