महापालिकेची वीस वर्षांनंतर महापौर करंडक एकांकिका स्पर्धा

महापालिकेची वीस वर्षांनंतर महापौर करंडक एकांकिका स्पर्धा
Published on: 
संभाजीनगरात महापौर करंडक एकांकिका ---- महापालिकेतर्फे तब्बल वीस वर्षांनंतर आयोजन, २६ व २७ डिसेंबरला स्पर्धा ः एक लाखाचे प्रथम पारितोषिक --- सकाळ वृत्तसेवा छत्रपती संभाजीनगर, ता. १३ ः महापालिकेची २००५ पासून बंद पडलेली महापौर करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा यंदा पुन्हा सुरू करण्यात येत असल्याचे महापौर समीर राजूरकर यांनी शुक्रवारी (ता. १३) पत्रकार परिषदेत सांगितले. राज्यातील उदयोन्मुख कलाकार, लेखक, दिग्दर्शक आणि नाट्यसंस्थांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने २६ व २७ डिसेंबरला या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे. महापौर राजूरकर म्हणाले, राज्यातील उत्कृष्ट कलावंत, दिग्दर्शक आणि लेखक यांच्या कलागुणांना वाव देण्याबरोबरच नाट्यकलेचा प्रचार व प्रसार करण्याचा महापालिकेचा मानस आहे. नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार असल्याने सांस्कृतिक क्षेत्रालाही चालना मिळेल. स्पर्धेतील सांघिक पारितोषिकांमध्ये प्रथम क्रमांकासाठी एक लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ७५ हजार रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी ५० हजार रुपये देण्यात येणार आहेत. याशिवाय दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी २५ हजार रुपयांची असतील. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, लेखन, पुरुष अभिनय, महिला अभिनय, संगीत, नेपथ्य, प्रकाशयोजना, रंगभूषा व वेशभूषा अशा विविध विभागांतही पारितोषिके दिली जाणार आहेत. स्पर्धेसाठी एकूण चार लाख दहा हजार रुपयांची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. --------- १६ डिसेंबरपर्यंत नोंदणी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रत्येक एकांकिकेसाठी दोन हजार रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात येणार असून, नोंदणीची अंतिम मुदत १६ डिसेंबर आहे. स्पर्धकांनी सादरीकरणाच्या दोन तास आधी स्पर्धास्थळी उपस्थित राहणे आवश्यक आहे. तसेच एकांकिकेसाठी लागणारे साहित्य स्वतः आणावे लागणार आहे. २६ डिसेंबरला सकाळी १० वाजता स्पर्धेला सुरवात होईल, तर २७ डिसेंबरला सायंकाळी सहा वाजता पारितोषिक वितरण होणार आहे. पत्रकार परिषदेला उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, सभागृहनेते गोविंद केंद्रे, विरोधी पक्षनेते समीर बिल्डर, आयुक्त अमोल येडगे, अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, उपायुक्त अंकुश पांढरे यांची उपस्थिती होती. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.