‘ओपन’चा कटऑफ ५३८; खासगीत ४८२

‘ओपन’चा कटऑफ ५३८; खासगीत ४८२
Published on
‘एमबीबीएस’साठी गुणांची चुरस -- शासकीय ‘ओपन’ कटऑफ ५३८; खासगीत ४८२ ----- सकाळ वृत्तेसवा छत्रपती संभाजीनगर, ता. ३१ : राज्य कोट्यातील एमबीबीएस आणि बीडीएसच्या एकूण १० हजार ६४६ जागांपैकी १० हजार ५०९ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. पहिल्या फेरीत शासकीय एमबीबीएससाठी सर्वाधिक गुणांची चुरस पाहायला मिळाली असून, ‘ओपन’ प्रवर्गाचा कटऑफ ५३८ गुणांवर, तर खासगी एमबीबीएसमध्ये तो ४८२ गुण राहिला. शासकीय बीडीएसमध्ये ‘ओपन’चा कटऑफ ४९३, तर खासगी बीडीएसमध्ये ३५२ गुणांवर थांबला. पहिल्या फेरीतील कटऑफमधून शासकीय एमबीबीएस हा विद्यार्थ्यांचा सर्वाधिक पसंतीचा पर्याय असल्याचे दिसते. त्यानंतर शासकीय बीडीएससाठीही उच्च गुणांची आवश्यकता आहे. दुसरीकडे खासगी महाविद्यालयांमध्ये तुलनेने कमी गुणांवर वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय प्रवेशाची दारे खुली झाली आहेत. त्यामुळे पहिल्या फेरीत जागा न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुढील फेऱ्यांमध्ये कटऑफमध्ये किती बदल होतो, याकडे लक्ष लागले आहे. शासकीय एमबीबीएसमध्ये खुल्या प्रवर्गानंतर एनटी-डी ५३५, इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) ५३३, विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) ५३४ आणि सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (एसईबीसी) ५२९ गुणांवर कटऑफ राहिला. त्यामुळे या प्रवर्गांमध्येही ५३० च्या आसपास गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रवेशासाठी चुरस असल्याचे दिसते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकचा (ईडब्ल्यूएस) कटऑफ ५१३, तर भटक्या जमाती-क (एनटीसी) ५२१ आणि भटक्या जमाती- ब (एनटीबी) ४७७ राहिला. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी ४६३, तर अनुसूचित जमातीसाठी ३८४ गुणांचा कटऑफ आहे. खासगी एमबीबीएस महाविद्यालयांमध्ये मात्र कटऑफमध्ये लक्षणीय घट झाली आहे. ओपनचा कटऑफ ४८२ गुण असून, एसईबीसी ४६२, ओबीसी ४७६, एसबीसी ४७९ आणि ईडब्ल्यूएस ४८२ गुणांवर आहे. म्हणजेच शासकीय आणि खासगी एमबीबीएसमधील ओपन प्रवर्गाच्या कटऑफमध्ये ५६ गुणांची तफावत आहे. बीडीएसमध्येही सरकारी-खासगी मोठी दरी शासकीय बीडीएस अभ्यासक्रमासाठी ओपन प्रवर्गाचा कटऑफ ४९३ गुण असून, एसबीसीचा सर्वाधिक ४८४ आणि ओबीसीचा ४८० गुण आहे. एसईबीसी ४७४, एनटीसी ४७१ आणि एनटीडी ४६६ गुणांवर कटऑफ राहिला. खासगी बीडीएसमध्ये मात्र ओपनचा कटऑफ ३५२ गुणांपर्यंत खाली आला. एसबीसीसाठी ३६६, ईडब्ल्यूएस ३५५, ओबीसी ३५० आणि एससी ३४८ गुणांवर प्रवेशाची संधी मिळाली. ---- कटऑफमधील फरक काय सांगतो? सरकारी एमबीबीएस आणि खासगी एमबीबीएसमध्ये ओपन कटऑफची ५६ गुणांची तफावत सरकारी बीडीएस आणि खासगी बीडीएसमध्ये ओपन कटऑफची १४१ गुणांची मोठी दरी सरकारी एमबीबीएसचा ओपन कटऑफ ५३८, तर खासगी बीडीएसचा ३५२ त्यामुळे गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांसमोर एमबीबीएस, बीडीएस आणि महाविद्यालयाच्या प्रकारानुसार पर्याय बदलण्याची शक्यता आहे, असे समुपदेशकांनी सांगितले. पहिल्या फेरीत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांनी चार सप्टेंबर २०२६ सायंकाळी ५.३० पर्यंत संबंधित महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com