Medical Admission: वैद्यकीय प्रवेशाच्या पहिल्या फेरीतील ‘चॉइस फिलिंग’ व ‘चॉइस लॉकिंग’साठी मुदतवाढ
Medical College: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिपत्याखालील वैद्यकीय सल्लागार समितीने पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेशातील पहिल्या फेरीतील ‘चॉइस फिलिंग’ आणि ‘चॉइस लॉकिंग’साठी मुदतवाढ जाहीर केली आहे. ही मुदतवाढ एनआरआय, सीडब्ल्यू उमेदवारांच्या विनंत्या आणि न्यायालयीन प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर देण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिपत्याखालील वैद्यकीय सल्लागार समितीने (एमसीसी) पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेशप्रक्रियेतील पहिल्या फेरीतील ‘चॉइस फिलिंग’ आणि ‘चॉइस लॉकिंग’साठीची मुदतवाढ दिली आहे.