
बीड : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आणि गुन्हेगारीच्या घटनांवर पायबंद घालण्याच्या दृष्टीने पोलिस दलाने कडक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. संतोष देशमुख हत्या व खंडणी प्रकरणात वाल्मीक कराडच्या टोळीवर मकोका लावल्यानंतर आणखी एका सहा जणांच्या गुन्हेगारी टोळीवर मकोका लावण्यात आला आहे. यामध्ये गुन्हेगारांच्या टोळीत तीन महिलांचा समावेश आहे. या टोळीने बीडसह अहिल्यानगर, सोलापूर जिल्ह्यात विविध गुन्हे केले आहेत.