Vilas Bhumre: अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर ‘मकोका’; मुख्यमंत्री, संभाजीनगरकडे विशेष लक्ष देणार
MCOCA: अमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांवर आता मकोका कायदा लावण्यात येणार असून, गुन्हेगारांवर कठोर कारवाई होणार आहे. या कायद्यातील सुधारणा विधानसभेत संमत झाली असून, लवकरच ती विधीमंडळात मंजूर होईल.
छत्रपती संभाजीनगर : अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर पूर्वी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) लावला जात नव्हता. त्यामुळे यातील गुन्हेगार वारंवार सुटायचे आणि पुन्हा हा धंदा करायचे.