Parbhani Elections : आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या हट्टामुळे भाजपाला बहुमत हुकलं, मेघना बोर्डीकर यांचे प्रयत्न अपूर्ण

Parbhani District Elections : परभणीच्या जिंतूर-सेलू विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या आमदार मेघना बोर्डीकर यांना मंत्रीमंडळात स्थान मिळाल्यानंतर त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवून भाजपला मोठे यश मिळवून दिले, पण काही निवडणुकांमध्ये अपेक्षित यश मिळाले नाही.
Parbhani District Elections

Parbhani District Elections

sakal

Updated on

परभणी : परभणीच्या जिंतूर - सेलू विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आलेल्या भाजपाच्या आमदार मेघना बोर्डीकर यांना भाजपाने मंत्रीमंडळात स्थान दिले. मेघना बोर्डीकर यांना राज्यमंत्री पदासह परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

पक्षाने मोठी संधी दिल्याने मेघना बोर्डीकर यांनी परभणी जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची ताकद वाढवण्यासाठी झपाटून काम सुरू केलं. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी घेतला. त्यामुळे कधी नव्हे ते जिल्ह्यात पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाला मोठ यश मिळालं, जिंतूर व सेलूच्या 02 नगराध्यक्षसह जिल्ह्यात भाजपचे 34 नगरसेवक निवडून आले. त्यासोबतच सोनपेठ नगरपालिकेत परिवर्तन आघाडीचे पॅनल उभे करत सोनपेठ नगराध्यक्षासह 08 नगरसेवक पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी निवडून आणले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com