ABD26J78761
एमजीएम एसओईटीचा तांत्रिक महोत्सवात सहभागी विद्यार्थी, मान्यवर.
-
एमजीएम ‘एसओईटी’चा
तांत्रिक महोत्सव उत्साहात
-
छत्रपती संभाजीनगर, ता. ६ : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजीतर्फे घेण्यात आलेला ‘सुपरनोव्हा : स्पार्क द फ्युचर २.०’ हा दोनदिवसीय तांत्रिक महोत्सव उत्साहात झाला. समारोप समारंभात स्पर्धांतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
कुलपती अंकुशराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव झाला. यात राज्यभरातील विविध विद्यापीठे, अभियांत्रिकी महाविद्यालये तसेच शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ‘सुपरनोव्हा : स्पार्क द फ्युचर’ या तांत्रिक महोत्सवाचे हे दुसरे वर्ष असून यंदा महोत्सवाला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांमधील तांत्रिक कौशल्य, नवकल्पनाशक्ती, सर्जनशीलता आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करण्याच्या उद्देशाने हा महोत्सव घेण्यात आला. यात स्टेलर, प्रोटोनोव्हा, कॉस्मोबोल्ट, स्पार्क्स, कोडबर्स्ट, ज्युनियर शार्क्स, निंजा कोडर्स, इन्फिनिटी लॅब आणि बॅटलक्लिप्स अशा नऊ विविध स्पर्धा झाल्या.
बागला ग्रुपचे अध्यक्ष ऋषिकुमार बागला, टोयोटा त्सुशो इंडियाचे वरिष्ठ व्यवस्थापक श्रीकांत पात्रा, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, संचालिका प्रो. डॉ. परमिंदर कौर धिंग्रा आदी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर करून नवकल्पनांच्या माध्यमातून समाजातील विविध समस्यांवर उपाय शोधण्याचे आवाहन केले.