
छत्रपती संभाजीनगर : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने यंदा एमबीए सीईटीनंतर एमएचटी-सीईटीतही ‘नॉर्मलायझेशन’ पद्धत अवलंबिण्याचा निर्णय घेतला आहे. ही परीक्षा विविध सत्रांमध्ये (शिफ्टमध्ये) घेतली जाणार असल्याने सर्व विद्यार्थ्यांना समान न्याय मिळावा, यासाठी ही पद्धत लागू केली जात आहे; तसेच अर्जात चूक असलेल्या विद्यार्थ्यांना अंडरटेकिंग फॉर्म भरून परीक्षा केंद्रात प्रवेशाची संधीही मिळणार आहे.