Chh. Sambhajinagar : पडेगावात दोन गटांत राडा; अकरा जणांवर परस्परविरोधी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

Padegaon Group Clash : पडेगाव येथील अन्सार कॉलनीत जुन्या वादातून दोन गटांमध्ये मध्यरात्री तुंबळ हाणामारी झाली. चाकू, लोखंडी रॉड व लाकडी दांड्यांचा वापर करून गंभीर जखमी करण्यात आले असून, अकरा जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
Chh. Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar Crime Newsesakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर: जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. चाकू, लोखंडी रॉड, लाकडी दांड्याचा वापर करत एकमेकांवर जीवघेणे हल्ले केले. ही घटना ३१ मे रोजी मध्यरात्री पडेगावच्या अन्सार कॉलनीत घडली. याप्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी दिलेल्या तक्रारीवरून अकरा जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com