
पैठण : दरवर्षी हिवाळा सुरू झाला की विदेशी स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन येथील जायकवाडी धरण प्रकल्पाच्या अथांग नाथसागरावरील पक्षी अभयारण्यात होत असते. परंतु, यंदा मात्र परतीचा पाऊस, वातावरणातील बदल, धरणातील वाढलेली पाण्याची पातळी या कारणांमुळे विदेशी पक्ष्यांचे येथील आगमन लांबणीवर पडले आहे.