

छत्रपती संभाजीनगर : साडेपंधरा वर्षांच्या मुलीचा विवाह केल्यानंतर ही मुलगी प्रसूत होऊन तिला मुलगा झाला. हा प्रकार समजताच वेदांतनगर पोलिसांनी स्वतः तक्रारदार होत मुलीचा पती, सासू आणि मुलीच्या आईवडिलांविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार बलात्कार आणि बालविवाह प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला.