MLA Kailas Patil : आमदार कैलास पाटील यांच्या निधीतून सोनेगावात 'स्वामी विवेकानंद अभ्यासिका'चे उद्घाटन

Swami Vivekananda Abhyasika Sonegaon : शिक्षण हीच ग्रामीण विकासाची किल्ली मानून आमदार कैलास पाटील यांनी मतदार संघात 'अभ्यासिका चळवळ' सुरू केली आहे. येरमाळा पत्रकार संघाच्या संकल्पनेतून प्रेरणा घेत आता प्रत्येक गावात अशा सुसज्ज अभ्यासिका उभारल्या जाणार आहेत.
Swami Vivekananda Abhyasika Sonegaon

Swami Vivekananda Abhyasika Sonegaon

sakal

Updated on

येरमाळा : धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी विधानसभा निवडणूक प्रचारदरम्यान प्रत्येक गावात मंदिरं बांधण्या ऐवजी अभ्यासिका उभारण्याचा संकल्प व्यक्त केला होता.त्यांनी प्रचारदरम्यान येरमाळा पत्रकार संघाचा हा उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी आवश्यक सुविधा गावातच उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने केला जाईल अभ्यासिका हा पत्रकार संघाचा संकल्प मतदार संघातील प्रत्येक गावात राबविण्याचा संकल्प त्यांनी विधानसभा निवडणुका प्रचारत प्रत्येक गावात बोलून दाखवला होता.त्यानुसार सोनेगाव येथे आमदार निधीतून पहिल्या ‘स्वामी विवेकानंद अभ्यासिका’ उभारण्यात आली आहे. आमदार कैलास पाटील यांनी दिलेल्या निधीतून ही सुविधा साकार झाली असून अभ्यासिकेचे उद्घाटन उत्साहात पार पडले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com