
छत्रपती संभाजीनगर - केज (जि. बीड) येथील आमदार नमिता मुंदडा यांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या निवडणूक याचिकेत मुंदडा यांच्यासह सर्व उमेदवार व निवडणूक आयोग यांना नोटीस बजावण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांनी दिले आहेत.
नमिता मुंदडा या केज विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर विजयी झाल्या आहेत. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांनी निवडणूक लढवली होती. निवडणूकीत पराभव झाल्यानंतर उमेदवार पृथ्वीराज शिवाजी साठे यांनी खंडपीठात निवडणूक याचिका दाखल केली.