

Maharashtra Politics Women Empowerment
sakal
कन्नड : राजकारणात अनेक वेळा पद, प्रोटोकॉल आणि सत्तेचे अंतर स्पष्ट दिसते. मात्र कन्नडच्या प्रथमच विधानसभेत निवडून आलेल्या शिवसेना (शिंदे गट) आमदार संजना जाधव यांनी हे अंतर पुसून टाकणारा एक अनोखा आणि संवेदनशील प्रयोग करून दाखवला आहे. गुलाबी साडी परिधान करून, अगदी आशा सेविकांसारख्याच वेशात त्यांनी दिलेला “मीही तुमच्यातलीच आहे” हा संदेश आज संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत आहे.