Chatrapati Sambhajinagar : आमदार सतीश चव्हाण यांना ‘ते’ प्रसिद्धीपत्रक भोवणार! दोन दिवसांत कारवाई करणार

आमदार चव्हाण यांचे मनातील खदखद व्यक्त करणारे पत्र त्यांना भोवणार, हे आता स्पष्ट झाले आहे. तटकरे यांनी यासंदर्भात माध्यमांशीही संवाद साधला.
MLA Satish Chavan
MLA Satish Chavansakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर - जवळपास दीड वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारमध्ये सहभागी झाला. तथापि, मराठा, ओबीसी, धनगर यांच्या आरक्षणासह बहुजनांचे प्रश्‍न हे सरकार सोडवू शकले नाही, असे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी मंगळवारी (ता. १५) प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले होते. चव्हाणांच्या या पत्राची पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी चांगलीच दखल घेतली असून, आमदार चव्हाण यांच्यावर दोनच दिवसांत ‘राजकीय’ कारवाई होणार असल्याचे त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com