
छत्रपती संभाजीनगर : येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सोमवारी (ता. चार) सकाळी नऊपासून एक्सलन्स सेंटरच्या प्रवेशद्वारावर सुरू केलेले आंदोलन मंगळवारी सुरूच होते. नियम पाळण्याच्या भूमिकेवर विद्यापीठ प्रशासन ठाम असून, मागण्यांवर कुलगुरूंनी आंदोलकांशी चार तास सकारात्मक चर्चा केल्याने आंदोलन रात्री उशिरा निवळल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले.