Parking Fine Protest : छत्रपती संभाजीनगर महापालिकेसमोर मनसेने पार्किंगची सुविधा नसताना दंड वसुलीवरून आंदोलन केले. यावेळी बनावट पाचशेच्या नोटा उधळण्यात आल्या.
छत्रपती संभाजीनगर : शहरात पार्किंगची व्यवस्था होत नाही, तोपर्यंत दंडात्मक कारवाई करू नये, अशी मागणी करत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शुक्रवारी (ता. सहा) महापालिकेसमोर आंदोलन करून पैसे पाहिजे का, असे म्हणत पाचशेच्या बनावट नोटा उधळण्यात आल्या.