
केज : अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका तरुणाची दुचाकी अडवून शेतात नेऊन त्याला झाडालाबांधून सात जणांनी केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला असून, एक जखमी झाल्याची घटना सोमवारी (ता. २६) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. याप्रकरणी मंगळवारी (ता. २७) सात जणांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. मारहाण करणाऱ्यांपैकी सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले, तर यातील एक जण फरारी असल्याने पोलिस त्याचा शोध घेत आहेत.