छत्रपती संभाजीनगर - कर्जदारांना मानसिक, शारीरिक त्रास देत कर्जाच्या बदल्यात प्लॉट, जमिनी लाटणाऱ्या अवैध सावकार महिलेविरोधात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. पण, १२ दिवसांनंतरही महिलेविरोधात कारवाई झाली नाही, तर दुसरीकडे संबंधित सावकार महिला ही गुंडांच्या माध्यमातून कर्जदारांना तक्रार मागे घेण्यासाठी ठार मारण्याच्या धमक्या देत असल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी वळदगाव (ता. छत्रपती संभाजीनगर) येथील कर्जदाराचा मुलगा सुनील पठाडे यांनी सातारा पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली.