सुचना - तुळजाभवानी मंदिरातील भु

सुचना - तुळजाभवानी मंदिरातील भु
Published on: 
रांगोळीतून संदेश : आईच्या त्यागाची जाणीव ठेवता का? माजलगाव, ता. १४ (बातमीदार) : आई ही कुटुंबाचा आधार असते. मुलगी, पत्नी, बहीण आणि सून अशा विविध नात्यांची जबाबदारी समर्थपणे सांभाळताना ती अनेकदा स्वतःच्या इच्छा-आकांक्षांना बाजूला ठेवते. मात्र, तिच्या त्यागाची आणि कष्टांची जाणीव समाजाला कितपत आहे, असा विचारप्रवर्तक प्रश्न उपस्थित करत कला साधक युवा मंचच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त महिलांच्या सन्मानाचा संदेश देण्यात आला. शहरातील तुळजाभवानी मंदिरात भुईअलंकरणातून साकारलेली आईवरील आकर्षक रांगोळी भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. ‘एवढी नाती ती सांभाळते, पण तुम्ही तिला सांभाळता का?’ या आशयाच्या संदेशातून महिलांप्रती आदर, कृतज्ञता आणि जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली आहे. रांगोळीच्या माध्यमातून नारीशक्तीचा गौरव करत महिला सन्मान आणि सामाजिक जनजागृतीचा प्रयत्न करण्यात आला. नवरात्रोत्सवात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. मात्र, घरातील आई, बहीण, मुलगी आणि पत्नी यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करणेही तितकेच महत्त्वाचे आहे, हा विचार या कलाकृतीतून मांडण्यात आला आहे. महिलांचा सन्मान आणि त्यांच्याप्रती संवेदनशीलता हीच समाजाच्या प्रगतीची दिशा असल्याचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे भाविकांकडून कौतुक होत आहे. ----- MAJ26A06352 माजलगाव : भावना कुलकर्णी, महिला सहकारी, कृष्णा सोळंके यांनी मंदिरात साकारलेली आकर्षक भुईअलंकरण रांगोळी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com