
औरंगाबाद : गणोरी फाट्याजवळ धावत्या कारने अचानक घेतला पेट
फुलंब्री : फुलंब्री-औरंगाबाद रस्त्यावरील गणोरी फाट्यानजीक एका धावत्या कार ने अचानक पेट घेतला असल्याची घटना घडली आहे. यात सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र या घटनेत कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. सदर घटना रविवारी (ता.22) सायंकाळी सहा वाजता घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, औरंगाबाद येथील अमित भुईगळसह इतर दोन जण हे रविवारी सायंकाळी फुलंब्री हुन -औरंगाबाद कडे महिंद्रा रेस्टॉन क्रमांक एम एच २० डि व्ही १७०० या कारने जात असता़नी गणोरी फाट्यानजीक असलेल्या साई इंजेनिअरिंग कॉलेज समोर या धावत्या कारने अचानक पेट घेतला.
पेट घेतल्याचे लक्षात येताच भुईगळ यांनी गाडी थांबवली व इतर दोन जणांना गाडी थांबवुन त्वरीत गाडीच्या खाली उतरवले व पाहता पाहता या आगीने रुद्र रूप धारण करून काही वेळातच कार जळून खाक झाली. आजूबाजूला कुठलीही पाण्याची व्यवस्था नसल्याने कारला लागलेली आग विझविण्याचे प्रयत्न अयशस्वी झाले. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवित हानी घडली नाही. मात्र लाखो रुपायाची कार या अगीत जळून खाक झाली आहे. येणा-या जाणाऱ्यांनी प्रवाशांनी आग पाहून आश्चर्य व्यक्त केले आहे. सदर घटनेची नोंद फुलंब्री पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सय्यद मुजीब करत आहे.
Web Title: Moving Car Suddenly Got Fire Near Ganori Fata Aurangbad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..