योगी आदित्यनाथ म्हणजे मच्छर; दलवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

amc aurangabad

"हिंदू राष्ट्रामुळेच त्यावेळी पाकिस्तानची मागणी पुढे आली; मात्र मी पाकिस्तानचे समर्थन करणार नाही. भाजपची सुरवातीपासूनची विचारधारा हिंदू राष्ट्राचीच आहे. फक्त तीन टक्के लोकांसाठी यांना देश हिंदू राष्ट्र करायचा आहे.

योगी आदित्यनाथ म्हणजे मच्छर; दलवाई

औरंगाबाद- ""खोटे बोला आणि द्वेष करा, हेच संस्कार यांना शाखेतून दिले जातात. महात्मा गांधी, पंडित नेहरूंनी मोठ्या मेहनतीने देश घडविला. त्यांच्यापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा काहीच नाहीत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मच्छर आहेत. तुम्ही आम्हाला कशाचे पुरावे मागता? देश तुमच्या बापाचा आहे का? ज्या जनतेने सत्ता दिली तीच जनता एकेदिवशी सत्तेवरून खाली उतरवतील. त्यामुळे जास्त मस्ती करू नका,'' असा इशारा खासदार हुसेन दलवाई यांनी गुरुवारी (ता.23) दिला. 

मौलाना आझाद विचारमंचतर्फे तीनदिवसीय राज्यस्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याच्या उद्‌घाटनप्रसंगी श्री. दलवाई बोलत होते. व्यासपीठावर माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर, एमजीएमचे कुलपती अंकुशकुमार कदम, माजी खासदार उत्तमसिंग पवार, माजीमंत्री अनिल पटेल, सुभाष लोमटे, प्रतापराव बोराडे, संजय लाखे पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून भाजपला टार्गेट करताना पुढे दलवाई म्हणाले, ""हिंदू राष्ट्रामुळेच त्यावेळी पाकिस्तानची मागणी पुढे आली; मात्र मी पाकिस्तानचे समर्थन करणार नाही. भाजपची सुरवातीपासूनची विचारधारा हिंदू राष्ट्राचीच आहे. फक्त तीन टक्के लोकांसाठी यांना देश हिंदू राष्ट्र करायचा आहे.

मग मुस्लिम, ख्रिश्‍चन यांना समुद्रात बुडवायचे आहे का? आम्हाला पुरावे मागून पाकिस्तानात पाठवाल मग तुम्ही कुठे जाणार? असा प्रश्‍न दलवाई यांनी केला. नेहरू, इंदिरा गांधी यांनी जनतेसाठी अनेक निर्णय मागे घेतले; मात्र मोदी, शहा माघार घ्यायला तयार नाहीत. देशभरात आंदोलन पेटले; पण कोणी साधा दगडदेखील उचलला नाही. कारण आम्ही महात्मा गांधी, मौलाना आझाद यांच्या विचाराला मानणारे आहोत. तुम्हाला देशातील जनतेने सत्ता दिली आहे. तुमच्या शाखेने नव्हे. त्यामुळे जास्त मस्ती करू नका, सत्तेतून खाली उतरविण्याची ताकद जनतेमध्येच आहे.'' 
 
नेहरूंचे जॅकेट चोरले 
मोदी जॅकेटवरूनही दलवाई संतप्त झाले. कसले मोदी जॅकेट? हे तर पंडित नेहरू यांचे जॅकेट आहे. मोदींनी जॅकेट चोरल्याचा आरोप दलवाई यांनी यावेळी केला. 

Web Title: Mp Hussein Dalwai News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..