
छत्रपती संभाजीनगर : अन्न व औषधी प्रशासकीय सेवेतील मुख्य परीक्षेच्या उत्तरपत्रिका आठ दिवसांमध्ये याचिकाकर्त्यांना उपलब्ध करून देण्याचे निवेदन एमपीएससीतर्फे करण्यात आले. ते म्हणणे रेकॉर्डवर घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या.एस.जी. मेहरे आणि न्या. संदीपकुमार मोरे यांनी याचिका निकाली काढली.