
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील १० लाख २४ हजार ४०० ग्राहकांकडे १,८७१ कोटी ५१ लाख ५८ हजार रुपये थकबाकी आहे. यामध्ये आतापर्यंत केवळ १३ कोटी रुपये वसूल झाले आहेत. अभय योजनेला मुदतवाढ दिल्याने वीजबिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकार माफीच्या संधीचा फायदा घेण्याचे आवाहन महावितरण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता यांनी केले आहे.