औरंगाबादेत म्यूकर मायकोसिसचा धोका वाढला! शहरात तीनशेवर रुग्ण

सर्वाधिक रुग्ण घाटीत, १४ रुग्णालयात सुरु उपचार
mucormycosis
mucormycosismucormycosis
Updated on

औरंगाबाद: कोरोनाचा संसर्ग कमी होत आहे, ही सुखद बाब असली तरी, शहरात म्यूकर मायकोसिसचा (mucormycosis infection) धोका वाढू लागला आहे. शहरात म्यूकर मायकोसिसचे ३११ रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर शहरातील १४ रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. विशेष बाब म्हणजे यातील सर्वाधिक ८० रुग्ण हे घाटीत उपचार घेत असल्याची माहिती गुरुवारी (ता.२७) महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

फंगल इन्फेक्शनमुळे काही जणांना चक्क डोळा गमवावा लागला आहे. तर काही जणांवर शस्त्रक्रिया करुन त्यांच्या जबडा काढून टाकण्यात आला आहे. म्यूकर मायकोसीसचे गंभीर स्वरुप पाहता महापालिकेकडून सर्व रुग्णालयांकडून नियमित अहवाल मागविला जात आहे. गुरुवारच्या अहवालानुसार शहरातील १४ रुग्णालयात ३११ रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे. फंगल इन्फेक्शनची सुरूवात नाकापासून होते. हळूहळू ते टाळू, डोळे व मेंदूपर्यंत पसरते. नाकातला श्वास कोंडणे, काळ्या बुरशीचा चट्टा, नाक, टाळू (हार्ड पालट) येथे आढळणे, दात दुखणे, गाल दुखणे, चेहऱ्याच्या हाडांना (जबडा) असह्य वेदना होणे, डोळा दुखणे, डोळा सुजणे व दृष्टी कमजोर होणे ही लक्षणे आढळून येतात.

mucormycosis
दिलासादायक! मराठवाड्यातील रुग्णवाढ दोन हजारांच्या आत

रुग्णालयाचे नाव ------ रुग्णसंख्या

जिव्हाळा हॉस्पीटल- ५
लाईफ मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल- १
ओरियन सिटीकेअर सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल- ५
गोल्डन सिटी हॉस्पीटल -१
मेडीकव्हर हॉस्पीटल- १५
दुनाखे हॉस्पीटल- १
ॲपेक्स सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल- १५
युनायटेड सिग्मा हॉस्पीटल- १९
शासकीय दंत महाविद्यालय- १
बजाज हॉस्पीटल -१७
एमआयटी हॉस्पीटल- ३६
एमजीएम हॉस्पीटल -६८
घाटी रुग्णालय -८०
हेडगेवार हॉस्पीटल- ४७
-----------------------------
एकूण--------- -३११

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kunbi certificate latest update Maharashtra
New Harsul Development
Children, Smartphones and Mental Health: Why Parents Need to Take Mobile Addiction Seriously
Chandgude Family Tragedy
Marathi News Esakal
www.esakal.com