
संजय कुलकर्णी
छत्रपती संभाजीनगर : आषाढी वारीनिमित्त सध्या सर्वत्र दिंडी सोहळ्यानिमित्त टाळ-मृदंगाच्या साथीने विठ्ठलनामाचा जयघोष करीत वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यासह मराठवाड्यातील ठिकठिकाणच्या मृदंगांतून धार्मिक ऐक्याचा गजरही घुमत आहे; कारण यातील अनेक मृदंगांची निर्मिती छत्रपती संभाजीनगरात झालीय, तीही मुस्लिम कुटुंबातील कारागिरांकडून.