NAAC Accreditation : महाविद्यालयांना ‘नॅक’साठी अखेर सहा महिन्यांची मुदतवाढ; कुलसचिवांना सूचना, २३३ महाविद्यालयांना दिलासा
Higher Education News : राज्यातील 233 संलग्न महाविद्यालयांना नॅक मूल्यांकनासाठी 6 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. उच्च शिक्षण मंत्रालयाच्या निर्देशानुसार ही सवलत दिली गेली आहे.
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांनी संलग्नीकरणासाठी अनिवार्य केलेल्या महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकनासाठी मुदतवाढ देण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांच्या निर्देशानुसार ६ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.