दीपावलीत रोषणाई करायची सोडून

दीपावलीत रोषणाई करायची सोडून
Published on: 
नगर रोडवर महिनाभरापासून अंधार जिल्हाधिकारी कार्यालय ते नगर नाका दरम्यानचे पथदिवे बंद ----- बीड, ता. ८ : दिवाळीनिमित्त शहर रोषणाईने उजळले असताना नगर रोडवर मात्र महिनाभरापासून अंधार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय ते नगर नाका वर्दळीच्या मार्गावरील पथदिवे बंद असल्याने नागरिकांना रात्रीच्या वेळी अडचणींचा सामना करावा लागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडू ननगर नाक्याकडे आणि नगर नाक्याकडून पुतळ्याकडे जाणाऱ्या नागरिकांना या अंधारातून मार्ग काढावा लागत आहे. विशेषतः शासकीय विश्रामगृह ते नगर नाका या दरम्यान रात्रीच्या वेळी पायी जाणाऱ्यांना भीती वाटते. या मार्गावर यापूर्वी १०० फूट उंचीवर कमानीच्या आकारात दोन्ही बाजूंना प्रकाश देणारे पथदिवे बसविण्यात आले होते. मात्र, सध्या ते बंद असल्याने लाखो रुपये खर्चून उभारलेली यंत्रणा केवळ शोभेची वस्तू ठरली आहे. विद्युत विभाग आणि नगरपालिका प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करून पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी होत आहे. ----- दिवाळीचा सण आनंदात साजरा करण्यासाठी संपूर्ण शहर रोषणाईने उजळले पाहिजे. मात्र, नगर रोडवरील पथदिवे महिनाभरापासून बंद असल्याने या मार्गावर अंधार पसरला आहे. -अशोक जाधव ----- शासकीय विश्रामगृह ते नगर नाका या वर्दळीच्या मार्गावर रात्री किंवा पहाटे चालताना असुरक्षित वाटते. अंधारामुळे अपघात किंवा अन्य अनुचित प्रकार घडण्याची भीती असते. -आकाश आंधळे ----- दिवाळीसारख्या सणातही नगरपालिकेचा गलथान कारभार समोर आला आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून प्रशासनाने किमान सणाच्या दिवसांत तरी पथदिवे सुरू करावेत. -राजेंद्र आमटे, सामाजिक कार्यकर्ते ----- बंद पथदिव्यांसंदर्भातील तक्रारी निदर्शनास आल्या आहेत. या प्रकारची दखल घेत नगरपालिकेच्या विद्युत विभागाला पथदिवे दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागू नये व सणात कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. -विक्रम मांडूरके, मुख्याधिकारी, न. प.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.